पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील म्हसणे फाटा नवीन औद्योगिक वसाहतीत पळवे खुर्द गावच्या शिवारात ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान या घटनेमुळे तालुका परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पळवे गावाहून बाबुर्डी गावाला जात असताना म्हसणे फाटा नवीन औद्योगिक वसाहतीतील हद्दीत व पळवे खुर्द गावच्या शिवारातील बारगळ वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर नालीच्या कडेला एक ४०ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला असून. याबाबत तनय विजय गाडीलकर रा.पळवे खुर्द यांनी सोमवारी (दि.१५) सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सुपा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मात मृत्युची नोंद केली.
मयताचे वर्णन…
सदर व्यक्तीचे वय ४० ते ४५ च्या दरम्यान असावे बांधा सडपातळ असून उंची ५.६ इंच आहे. रंग काळासावळा असून केस वाढलेले आहेत, अंगात निळी जिन्स व निळसर फुल्ल शर्ट घातलेला आहे.
सदर वर्णनाचा कुणी व्यक्ती बेपत्ता असल्यास सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असे आवाहन सुपा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद