शिर्डी : जगात ख्याती असलेलं शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दर्शनासाठी खुले करण्यात आले असून. ऑनलाईन पासेसची मर्यादा असल्याने शिर्डीत येणार्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. यासंदर्भात विखेंनी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करून ऑफलाईन दर्शन पास सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून ऑफलाईन दर्शन पास सुविधेच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुरू करण्याबाबतही प्रशासनाने आग्रही भूमिका घ्यावी, अशीही मागणी आ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
SHIRDI: नियमाधीन राहून साई संस्थानचे प्रसादलाय सुरु करावे; विखेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नोव्हेंबर १८, २०२१
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद