पारनेर: बड्या' नेत्यांच्या हातात 'राष्ट्रवादीचा' झेंडा... शिवसेनेसाठी तो मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू

0

पारनेर/प्रतिनिधी: नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पहिला धक्का दिला आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले विजय डोळ यांनी रविवारी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे घडयाळ मनगटावर बांधले. अतिशय सक्षम व प्रामाणिक कार्यकर्ता पक्ष सोडून गेल्याने शिवसेनेसाठी तो मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू ठरली आहे. रविवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी आ. निलेश लंके यांच्या उपस्थितीत डोळ यांचा प्रवेश झाला. यावेळी विजय डोळ यांच्यासह डॉ.सचिन औटी, धिरज मांडहुळे, सौ.सुवर्णा विजय डोळ, सौ.प्रियांका सचिन औटी, रामदास औटी, बंडू गायकवाड, राजेंद्र म्हस्के आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी.सभापती गंगाराम बेलकर, सुरेशशेठ धुरपते, संजय मते, राहुल झावरे, सतीश भालेकर, नगरसेवक किसनदादा गंधाडे, नगरसेवक मुसद्दर सय्यद, नगरसेवक नंदकुमार देशमुख, नगरसेवक आनंदा औटी, नगरसेवक नंदकुमार औटी, नगरसेवक विलास सोबले, नगरसेवक साहेबराव देशमुख, भाऊसाहेब चौरे, उमाताई बोरुडे, नानी बोरुडे, विजय औटी, डॉ.बाळासाहेब कावरे‌, शैलेश औटी, राजू चेडे, सौ.वैजयंता मते, सौ.मयुरी औटी, सौ.कविताताई औटी, सौ.पाकिजाताई शेख आदी मान्यवर व शेकडो सहकारी उपस्थित होते. 

विजय डोळ यांची एक सच्चा व प्रामाणिक शिवसेना कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. राजकारणात पाउल टाकल्यापासून आम्ही मित्र आहोत. शिवसेनेच्या १५ वर्षांच्या सत्तेच्या काळात प्रामाणिकपणे काम करूनही डोळ यांना काहीही मिळाले नाही. ते आता आमच्यासोबत आले आहेत. त्यांना राजकारणात ताकद देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मी कटीबध्द आहे.  - आमदार निलेश लंके





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top