शिरूर / प्रतिनिधी: नगर, पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्हिजन केअर सेंटरचे (VISION CARE CENTER SHIRUR) नेत्ररोग तज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर आणि डॉ. सौ सोनल भालेकर यांच्या व्हिजन केअर टीमने अथक प्रयत्नातून एका ५ वर्षीय दीपकला दृष्टी प्रदान केली आहे. दीपक मूळचा कर्नाटक राज्यातला परंतु गेली अनेक वर्षे दिपकचे आई-वडील शिरूर शहरात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यातच दीपकला लहानपणापासून दृष्टीदोष असल्याने अंध दिपकला जग पाहाता येईल का अशी आई वडीलांना काळजी वाटत होती. दिपकच्या आई वडीलांनी डॉक्टर भालेकर दापत्यांचा नावलौकिक ऐकून एक दिवस ते डॉ.स्वप्नील भालेकर यांना भेटले. व्हिजन केअर सेंटरच्या डॉ. स्वप्नील भालेकर यांच्या माध्यमातून एक आशेचा किरण त्यांना दिसला. त्यानंतर डॉ.भालेकर यांनी दीपकला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करुण घेत दिपकच्या दोन्ही डोळयावर उपचारही सुरू केले. व्हिजन केअर सेंटरचा सर्व स्टाफ दिपकच्या दृष्टी सेवेसाठी सज्ज झाला. आणि काही वेळेतच दिपकच्या दोन्ही डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन डॉ.भालेकर दांपत्याने दिपकला दृष्टी माध्यमातून जग दाखवण्याची किमया पार पाडली. तो आनंदाचा क्षण पहाण्यासाठी गेली पाच वर्षे काळजीत असलेल्या दिपकच्या आई वडीलांनी आपला दिपक आपल्याला पहात आहे. हा आनंद गगणात मावेनासा झाला. त्यांनी डॉक्टर भालेकर दापंत्याचे आभार मानले. डॉक्टर तुमच्या रुपात आम्हाला देव भेटला. दिपकला दृष्टी देण्याचे काम करुन तुम्ही आम्हाला जगातला सर्वोत्तम आनंद मिळवून देण्याचे काम केले असून तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया दीपकच्या कुटूंबियांनी व्यक्त केली.
गेली पंधरा वर्षात डॉ.स्वप्नील भालेकर व डॉ.सोनल भालेकर यांनी असंख्य नेत्र शस्त्रक्रिया करुन हजारो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. नगर, पुणे, मुंबई या ठिकाणी जे उपचार होत नाहीत ते उपचार त्यांनी शिरूर येथील व्हिजन केअर सेंटर मध्ये उपलब्ध करून दिले आहे. दिपकला दृष्टी उपलब्ध करून देउन त्यांनी ईश्वरी सेवा करण्याचे काम केली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी डॉ. स्वप्नील भालेकर यांनी ऑपरेशनसाठी सहकार्य असलेले डॉ.सोनल भालेकर, भूलतज्ञ डॉ.रविंद्र जाधव व सर्व स्टाफ यांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद