निघोज/प्रतिनिधी: शिवबा संघटना आयोजित युवा संवाद मेळावा व किल्ले बनवा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम निघोज येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य डॉ भास्कर शिरोळे होते. प्रथमतः दिपप्रज्वलन झाले व छत्रपती शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी पारनेर व शिरूर तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवबा संघटनेचे मार्गदर्शक निघोज ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन मा. वसंत कवाद सर यांनी बोलताना शिवबा संघटनेच्या समाजाउपयोगी उपक्रमास बळ देण्याची भूमिका घेतली. यावेळी उपस्थितीमध्ये शिवसेना अवजड वाहतुक सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा दिपकराव घोलप पाटील माजी सरपंच ठकाराम लंके,ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, मा.जि. प.सदस्य विश्वनाथ दादा कोरडे,उपसरपंच उमेशभाऊ सोनवणे, उपसरपंच वडनेर विक्रम निचित आदींनी संघटनेस मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. शिवबा संघटनेच्या अहवानानुसार कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल संघटनेच्या शिलेदारांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामाजिक प्रश्न व आंदोलन आले कि शिवबा संघटनेचे नाव घ्यावे लागते. सामाजिक कामाबरोबरच राजकारणातही सामाजिक काम करणाऱ्या युवकांनी येण्याची गरज आहे.- भास्करराव शिरोळे
किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजक मा. राजु भाऊ लाळगे, प्रा. कवडे सर, प्रा. कवाद सरांचे व स्पर्धेत विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. यावेळी सुत्रसंचालन प्रितेश पानमंद व गणेश शेटे यांनी केले तर केशव शिंदे यांनी प्रस्तावना करताना संघटनेची माहिती दिली.
शिवबा संघटनेचा सहकारी एकटा नाही तर त्याबरोबर संपूर्ण शिवबा संघटना परीवार उभा आहे. प्रत्येक सहकाऱ्याला ताकद देण्याबाबत सूतोवाच त्यांनी केले.- शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे
शिवबा संघटनेचे विचार शिरूर तालुक्यात गावोगावी रुजवणार असल्याचे सांगितले. तसेच आभार नवनाथ बरशिले यांनी मानले.-सोमनाथ भाकरे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद