वेळेचे व्यवस्थापन हीच यशाची गुरुकिल्ली- मा. स्वाती थोरात (सहाय्यक राज्यकर आयुक्त)

0

निघोज/प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाची श्री. मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी परिसरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मकेंद्री व्हाव- मा. स्वाती थोरात 


अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावणे हे आजच्या तरुणाईचं स्वप्नं आहे. म्हणुन स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास हे गुण अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम व विषय कोणता आहे. प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे. सराव पेपर, उजळणी, गटचर्चा अशा पद्धतीने वरील प्रमुख मुद्दे घेऊन वेळेचे व्यवस्थापन व नियोजन केल्यास निश्‍चितच चांगले गुण मिळविता येतील.- मा. स्वाती थोरात

परिश्रम केल्यास नक्कीच यश मिळते-मा. स्वाती थोरात 



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची मदत म्हणुन महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान व मार्गदर्शन आयोजित करत असते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा व यश संपादन करावे असे सांगितले. "हार्ड वर्क'पेक्षा "स्मार्ट वर्क'वर अधिक भर दिला तर यश लवकर संपादन करता येते.- डॉ. सहदेव आहेर

आत्मपरीक्षण ही स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी आहे.- मा. स्वाती थोरात


 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण जाधव व प्राध्यापक सोमनाथ धोंडे यांनी केली तर आभार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्राध्यापक आनंद पाटेकर यांनी मांडले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभा स्पर्धा परीक्षेत दिसतात- मा. स्वाती थोरात 







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top