श्री. संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ व्या जयंती पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी

0

जवळे/प्रतिनिधीतिळवण तेली समाजाचे भूषण श्री. संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ व्या  जयंती पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे जेष्ठ समाजबांधव मदनशेठ कृष्णाजी रत्नपारखी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली. संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेची खरी ओळख देशात व जगातील वारकरी संप्रदायात टिकून ठेवण्याचे काम राष्ट्रीय संत श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे झाली आहे. श्री संत संताजी महाराज जगनाडे हे तुकाराम महाराजांचा १४ टाळकऱ्यांपैकी एक व तुकाराम महाराज यांचे शिष्य होय. श्री. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवल्यानंतर ती पुन्हा कोठेही दिसली नाही. परंतु श्री. संताजी महाराज जगनाडे हे जिथे जिथे तुकाराम महाराजांचे कीर्तन किंवा प्रवचन होत असेल तिथे तिथे जाऊन तुकाराम महाराजांनी म्हटलेले अभंग म्हणत असत. ज्यावेळी तुकारामांची गाथा बुडाली त्यानंतर संत जगनाडे महाराजांनी लिहिलेल्या अभंगातून पुन्हा तुकारामांच्या गाथेला मूळ रूप प्राप्त झाली आहे. 

जो समाज आपल्या थोर महापुरुषांचा इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडू शकत नाही श्री संताजी महाराज जगनाडे यांनी फक्त एका समाजासाठी नाही तर सर्व समाजासाठी म्हणून चे कार्य केले  म्हणून त्यांना संतही म्हणतात असे ते थोर आहे त्यामुळे तिळवण तेली समाजाने श्री संताजी महाराज जगनाडे यांचे जीवन चरित्र भविष्यातही येणाऱ्या पिढीला माहिती कळावे म्हणून शासनाकडे असा आग्रह धरावा की शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संताजी महाराजांची जीवन चरित्र  येणे गरजेचे आहे.- सोनाली संदिप सालके

याप्रसंगी जवळे ग्रामपंचायत सरपंच अनिता सुभाष आढाव, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली संदीप सालके, सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे, बाळासाहेब पठारे, लहू सालके, काळू साळवे, प्रकाश बडवे, संदिप शिवाजी सालके, संतोष मारुती सालके, समाजातील जेष्ठ मदन शेठ रत्नपारखी, विनायक शेलार, बाळासाहेब शेलार, बबन शेलार, माधव शेलार, बाळासाहेब शेजुळ, सुनील रत्नपारखी, सतीश लोखंडे, राहुल करपे, महेश शेलार, उमेश शेलार, अक्षय शेलार, ऋषिकेश शेलार, सुवर्ण विनायक, शेलार वैशाली, गणेश शेलार, धर्मनाथ विद्यालयातील शिक्षक संतोष जाधव, समीर काळे, अभिजीत जाधव, अण्णासाहेब सरोदे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top