पारनेर/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पारनेर यांचे वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामिण रुग्णालयामध्ये आरोग्य अधिकारी डाॅ.सतीश लोंढे व सर्व स्टाफने या यासाठी विशेष सहकार्य केले.
या वेळी पारनेर तालुक्यातील प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीया मधील पत्रकारांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. यामधे पत्रकारांच्या रक्त ब्लडप्रेशर, शुगर आदींसह विविध तपासण्या करण्यात आल्या. या वेळी सर्व पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कॅलेंडर व स्मरणिका देण्यात आली.
राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व पारनेर तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली या वेळी सहविचार सभा घेण्यात आली. यामधे पत्रकारांनी संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर ख्रिस्मस नाताळ निमीत्त उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या निवासस्थानी फराळ व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश लोंढे, संघटनेचे उपाध्यक्ष विनोद गायकवाड, शिरीष शेलार, एकनाथ भालेकर, सचिव राम तांबे, सहसचिव बाबाजी वाघमारे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, प्रसिध्दिप्रमुख श्रीनिवास शिंदे, संपर्कप्रमुख संजय मोरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुका अध्यक्ष पोपट पायमोडे, वृक्षमित्र लतिफ राजे, सदानंद सोनावळे, रामदास नरड, संतोष कोरडे, गंगाधर धावडे, विजय रासकर, सागर आतकर, आनंदा भूकन, गणेश जगदाळे आदींसह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी हजर होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद