पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील तब्बल ८३ विद्यार्थी तसेच कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. या विद्यार्थ्यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यापैकी १६ विद्यार्थ्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. यादरम्यान सर्व विद्यार्थ्यांची पारनेर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करत ज्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांना घरी पोहचविण्याची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उपचार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तसेच सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला सोबतच कोरोना बाधित विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप केले.
विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्यानंतर मी सर्व पालकांना आश्वस्त केलं होतं की, या विद्यार्थ्यांची मी पालक म्हणून जबाबदारी घेणार आणि त्याचप्रमाणे त्यांची काळजीही घेणार आणि मी ती काळजी घेतली आहे. अजूनही इतरही विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित होइपर्यंत त्यांचीही काळजी घेतली जाईल.- आ. निलेश लंके
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद