पारनेर/प्रतिनिधी - तालुक्यातील निघोज येथे संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने विद्युत वितरण महामंडळाकडून होणार्या गैरसोई विरोधात विद्युत वितरण महामंडळ निघोज कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालण्यात आला.
गेली एक महिन्यापासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक वेळा अधिकार्यांना सांगितले. मात्र दखल घेतली जात नाही. सध्या मोठ्या प्रमाणात निघोजसहीत परिसरातील कुकडी पट्ट्यातील १६ ते १८ गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत.त्यामुळे नियमित वीज पुरवठा सुरू झाला नाही तर रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू - सचिन पाटील वराळ
कांदा हे या परिसरातील महत्वाचे पीक असल्याने कांदा लागवडीसाठी विजेची समस्या प्रामुख्याने जाणवत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे भारनियमन न करता सकाळी आठ ते रात्री सात वाजेपर्यंत नियमित वीज पुरवठा करणे गरजेचे आहे. - तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे
सविस्तर वृत्त, निघोज तसेच परिसरातील नागरिकांना कायमचं विजेचा खेळखंडोबा..विज रोहीत्रामध्ये बिघाड.... अन् कमी दाबाने होत असलेला वीज पुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या निघोज ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रावर जागरण गोंधळ घालत कायमस्वरूपी उच्च दाबाने वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलनचं पुकारले. या आंदोलनामध्ये ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या मांडल्या. अखेर ग्रामस्थाच्या आक्रोशापुढे हतबल झाल्याने अभियंता प्रशांत आडभाई यांनी येत्या आठ दिवसात या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, माजी सदस्य भिमराव लामखडे, नीलेश घोडे, विलास हारदे, बजरंग वराळ, प्रगतीशील शेतकरी मच्छिंद्र लाळगे, अनिल शेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील कुकडी पट्ट्यातील बागायती भागात सध्या कांदा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असताना गावात सतत वीजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे शेतकर्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून याबाबत स्थानिक वीज उपकेंद्रावर संबधित अधिकार्यांना अनेकवेळा सुचना केल्या. मात्र वीजेबाबत सुधारणा होत नसल्याने येथील शेतकर्यांनी संदीप वराळ जनफौडेंशनचे अध्यक्ष सचिन वराळ व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालत प्रशासनाचे लक्ष वेधले. एक आठवड्यात येथील वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे उपस्थितीत अधिकार्यांनी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद