राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन पारनेर येथे आयोजन

0

पारनेर/प्रतिनिधी- पारनेर येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पारनेर, निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 23 ते 26 डिसेंबर दरम्यान चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी गंगा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

#Parner: कृषि प्रदर्शनातील #आमदार #निलेश #लंके यांचे पूर्ण भाषण

 

या कृषी प्रदर्शनात दीडशे ते दोनशे कृषीविषयक दुकाने व खाऊची दुकाने तसेच विविध कंपन्यांचे कृषी विषयक नवीन तंत्रज्ञान, नवीन अवजारे विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बाईक, बॅटरी पंप, पशुखाद्य, सिंचन, ठिबक, सेंद्रिय व रासायनिक खते, महिलांसाठी ऑटो स्टार्ट गृह उपयोगी वस्तू, सोलर तंत्रज्ञान, दूध काढण्याची मशीन, कुकूटपालन, महिला बचत गट अशा प्रकारचे स्टॉल लावून अनेकांनी  मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. कृषी प्रदर्शनाचे व्यवस्थापक बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे यावेळी माजी सभापती गंगाराम बेलकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे टाका राम लंके सोमनाथ वरखडे अशोक घुले विजय औटी भाऊसाहेब लामखडे सुवर्णा घाडगे पुनमताई मुंगसे सुदामती कवाद स्वाती इंगळे डॉक्टर बाळासाहेब कावरे कारभारी पोट गण जयसिंग मापारी अनिल गंधा ते शिवाजी शिंदे विजय डोळ बंडू गायकवाड आनंद आवटी की संगं धाडे आदी मान्यवर उपस्थित होते.



शेतकऱ्यांना नवनवीन शेती अवजारांची माहिती व्हावी या उद्देशाने पारनेर सारख्या ग्रामिन भागांमध्ये गेल्या तीन वर्षापासून कृषी प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोचवण्याचे व आधुनिक कृषी तंत्रज्ञान साहित्य ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. - आमदार निलेश लंके


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top