सावरगाव काळेवाडी परिसरामध्ये धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

0

पारनेर / प्रतिनिधी – पारनेर तालुक्यातील सावरगाव काळेवाडी येथील शंभुराजे प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा २०२१ चे उद्घघाटन आमदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी मार्केट कमिटीचे संचालक शिवाजी शेठ बेलकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अशोकराव घुले, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दादा थोरात, रवींद्र गायके, शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेठ गोडसे, उपाध्यक्ष इंद्रावण शेठ माने, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल शेठ माने, पैलवान दादा भाऊ चिकणे, पैलवान बाजीराव चिकणे, रामदास माने, शुभम बेलकर, पहिलवान साहेबराव चिकणे, पैलवान दादाभाऊ चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते. 




सांघिक खेळाच्या माध्यमातून खेळ खेळत असताना सामाजिक एकोपा वाढतो.

खेळांमधून युवकांची इच्छाशक्ती आणि विवेक बुद्धीला चालना मिळते त्यातून शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मनाची तंदुरूस्ती करता येते आणि त्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस लागतो. -  दीपक लंके


सावरगाव काळेवाडी परिसरामध्ये धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले ही फार मोठी आनंदाची बाब असून ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा गावा-गावात घेतल्या जाव्यात त्यातून विचारांची देवाण-घेवाण होऊन स्नेहबंध वाढतो पुढील वर्षीही शंभुराजे प्रतिष्ठान मोठ्या प्रमाणावर स्पर्धेचे आयोजन करावे त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत करू.- शिवाजी शेठ बेलकर( बाजार समिती संचालक )

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top