कोरठन गडावर दत्त जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र दर्शन NEWS
0

पारनेर/प्रतिनिधी-  तालुक्यातील श्री क्षेत्र कोरठन खंडोबा येथे पहाटे खंडोबास मंगलस्नान, पुजा व साजश्रृंगार  झाल्यानंतर सकाळी सात वाजता खंडोबाची अभिषेक, महापुजा श्री. राजाराम व सुरेखा मुंढे, श्री विजय व जया खोसे यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर खंडोबाची आरती झाली. देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, रामदास मुळे, विश्वस्त किसन मुंढे, सुरेश गुंजाळ, ज्ञानदेव माऊली घुले, जनार्दन महाराज मुंढे, यशवंत खोसे यांच्यासह भाविक उपस्थित होते. सकाळी ९:०० वाजता खंडोबाच्या उत्सव मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत मंदिरातुन निघाली. पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा करून आल्यानंतर लंगर तोडल्यानंतर पालखी मंदिरात आली. भाविकांना श्री. विकास पंढरीनाथ मुंढे व बाबाजी महादु खोसे परीवारातर्फे पौर्णिमेचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. देवस्थानतर्फे दर्शनबारी, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.




पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे दत्त जयंती पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेत पौर्णिमेची पर्वणी साधून खंडोबाचे दर्शन घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top