मुलिकादेवी महाविद्यालयात सफरचंद लागवड

0

निघोज/प्रतिनिधी- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने सफरचंदाची लागवड करण्यात आली. यावेळी पारनेर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. विजया ढवळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने APPLE ची पंच्याहत्तर झाडे आज महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आली.




आझादी का अमृत महोत्सव APPLE लागवड करून केला साजरा

APPLE वृक्ष लागवड यासाठी हर्मन ९९ जातीचे रोपे हरियाणा येथून कुरिअरने मागवण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत APPLE च्या शेतीसारखे अभिनव प्रयोग केले पाहिजे तसेच शास्वत शेती ही आज काळाची गरज आहे यासाठी आपण महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रयोग करत आहोत. - प्राचार्य डॉ. सहदेव आहेर 

यावेळी निघोज परिसरातील शेतकर्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांच्या कल्पनेतून  महाविद्यालयात सफरचंद झाडाची लागवड केली आहे. महाविद्यालयातील हा उपक्रम जिल्हय़ातील नावीन्यपूर्ण उपक्रम ठरून परिसरातील शेतकरी या उपक्रमाचा बोध घेऊन सफरचंद शेतीच्या बागा मोठ्या प्रमाणात तयार करतील व त्याचा फायदा उत्पन्न निर्मिती वाढेल असे सांगितले.




या प्रसंगी डॉ. मनोहर एरंडे, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. प्रविण जाधव, प्रा.आनंद पाटेकर, प्रा.पोपट सुबंरे, प्रा. संदीप लंके, डॉ.माणिक शिंदे, प्रा. सोमनाथ धोंडे, प्रा.अक्षय अडसूळ, प्रा. तुषार जगदाळे, प्रा. संगीता मांडगे, प्रा. नीलिमा घुले, प्रा.केशर झावरे, प्रा. सोनाली काळे, प्रा.अश्विनी सुपेकर, प्रा. हर्षदा गाडीलकर, प्रा. अंजली बोठे, प्रा.रेश्मा चौधरी, प्रा. नम्रता थोरात, अक्षय घेमूड, किशोर बाबर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top