पारनेर प्रतिनिधी/महाराष्ट्र दर्शन न्युज:
पारनेर तालुक्यातील रांधे येथे जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या माध्यमातून ७१ लाख रुपयांची विकासकामांचे उद्घाटन व भुमिपूजन जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ व गावचे सरपंच अरुण आवारी सर, उपसरपंच संतोष काटे, माजी सरपंच व ज्येष्ठ नेते बाळासाहेब आवारी यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आळकुटी निघोज जिल्हा परिषद गटातील विकासकामांसाठी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांचे सर्वाधिक योगदान असून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद गटाचे नेते सचिन पाटील वराळ यांनी कार्यक्षमपणे पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषद गटाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे प्रतिपादन रांधे गावचे सरपंच अरुण आवारी सर यांनी व्यक्त केले आहे. पारनेर तालुक्यातील रांधे येथे जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या माध्यमातून ७१ लाख रुपयांची विकासकामांचे उद्घाटन व भुमिपूजन जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ व गावचे सरपंच अरुण आवारी सर, उपसरपंच संतोष काटे, माजी सरपंच व ज्येष्ठ नेते बाळासाहेब आवारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सरपंच आवारी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी दिलीप आवारी सर, माजी सरपंच सबाजीराव शेटे, लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबई विभागाचे पदाधिकारी प्रविण साबळे, ग्रामपंचायत सदस्य अन्वरभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते संतोष लामखडे, ग्रामपंचायत सदस्य भगवान पावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष साबळे, माजी उपसरपंच वरुण सोनवणे, साईनाथ झिंजाड, प्रविण पावडे, ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, रमीज शेख, रामभाऊ वराळ पाटील आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य मच्छींद्र पाटील वराळ,माजी सरपंच व बाजार समितीचे उपसभापती संदीप पाटील वराळ यांनी जिल्हा परिषद गटात विकासाची मुहुर्तमेढ रोवली व जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील व सचिन पाटील वराळ यांनी या गटात विकासकामांचा डोंगर उभा करुण खऱ्या अर्थाने कलशारोहण केले असून वराळ कुटुंबाला गेली ७० वर्षांपासून सामाजिक कामांची आवड असल्याने सचिन पाटील वराळ यांच्या माध्यमातून आजही ते विकासाभिमुख राजकारण व समाजकारण करीत सर्वसामान्य माणसाला विकासाभिमुख करण्याचे काम करीत आहेत- सरपंच आवारी सर
उपसरपंच संतोष काटे यांनी यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील, पंचायत समिती सदस्या रोहिणीताई काटे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती दिली. जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती माध्यमातून जवळपास कोट्यवधी रुपयांच्या निधीतून या जिल्हा परिषद गटाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे प्रतिपादन उपसरपंच काटे यांनी व्यक्त केले आहे.
विकासकामे करताना खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील व आमदार निलेश लंके यांचे पाठबळ सातत्याने मिळाले आहे. म्हणून जनतेच्या आशिर्वादाने कामे मार्गी लागली आहेत. शैक्षणीक, धार्मिक, सामाजिक व राजकीय कामे करताना आपण राजकारणात नवखे असताना सुद्धा लोकांनी आपणाला भरभरून साथ दिली. जिल्हा परिषद गट व गणांची पुनर्रचना होताना या जिल्हा परिषद गटातून काही गावे दुसऱ्या गटात गेली तरीही आपण त्यांना यापुढच्या काळात विकासकामांची उणीव राहणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.- सचिन पाटील वराळ
यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून जिल्हा परिषद गटात झालेल्या विकासकामांचे कौतुक केले तसेच जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांचे विकासकामांबद्दल कौतुक केले तसेच जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांना यापुढेही पाठबळ देण्याचा शब्द दिला.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद