मेष (Aries): घरातील वातावरण शांत ठेवावे. स्थावर कामात लक्ष घाला. व्यावसायिक संघर्ष लक्षात घ्यावा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. आजचा दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. नवी कामे मिळतील. व्यवसायात वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ (Taurus): संमिश्र परिस्थिती लक्षात घ्यावी. सरकारी मदत मिळू शकेल. प्रलोभनापासून दूर राहावे. घरात नातेवाईक गोळा होतील. कौटुंबिक कुरबुरी लक्षात घ्याव्यात. नव्या व्यवसायासंबंधीची योजना मार्गी लागेल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना बरंच यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. वडिलांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वांसोबत बसून जेवण्याची इच्छा पूर्ण होईल.
मिथुन (Gemini) : वैवाहिक सौख्यात रमाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. यश डोक्यात जाऊ देऊ नका. कसलीही घाई उपयोगाची ठरणार नाही. सोपविलेले काम धडाडीने पूर्ण कराल.जोडीदार तसेच मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मित्र मंडळ तसेच वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. देवाची कृपा कायम राहील. योग्य ठिकाणी सन्मान द्या.
कर्क (Cancer) : घरगुती खर्चावर लक्ष ठेवा. बाह्यरुपावर भुलू नका. मैत्रीपूर्ण प्रेम वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. पैशांचे योग्य नियोजन करून गुंतवणूक करा. आज ऑफिसच्या कामात रस घ्याल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या मताला महत्त्व द्या. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. तुटपुंज्या ज्ञानावर खुश होऊ नका.
सिंह (Leo) : व्यवहार सजगतेने करावा. मेहनतीनुसार कमी अधिक फळ मिळेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कृतीत प्रामाणिकपणा ठेवावा. मानसिक स्थिरता बाळगावी.व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. शिक्षणात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात एखाद्या गोष्टीवरून तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीमध्ये प्रभाव पडेल. मंदिरात जाल.
कन्या (Virgo) : कामाचा व्याप लक्षात घ्यावा. कलागुणांना वाव द्यावा. दानधर्मावर खर्च कराल. कागदपत्रे जपून ठेवावीत. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जीवन साथीचे सहकार्य मिळेल. मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. खेळ खेळल्याने तंदुरुस्त राहाल.
तुळ (Libra) : व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा. नवीन गोष्टींची चाहुल लागेल. प्रवासावर खर्च होईल. बौद्धिक कौशल्य पणाला लागेल.मित्रांच्या मदतीने, व्यवसाय वाढीसाठी अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा आहे. रखडलेली सरकारी कामं आज होतील. सार्वजनिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. मोठ्या व्यक्तीचे आकर्षण वाटेल. आज विश्रांती मिळेल.
वृश्चिक (Scorpio) : कामाची घाई करू नका. अतिलोभ टाळावा. कष्टसाध्य प्रयत्नाला यश येईल. मोठ्या गुंतवणुकीत तज्ञांचा सल्ला घ्यावा. धार्मिक सहलीचे नियोजन कराल. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल. तब्बेती विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आईसोबत आज बाहेर जाल
धनु (Sagittarius) :वडीलधार्यांचा योग्य पाहुणचार करावा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. एकांत टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक कटकटी दूर कराव्यात. उधारीचे व्यवहार टाळावेत. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी नियोजन कराल. मित्र परिवार तसेच नातेवाईकांची चांगली साथ मिळेल. दिवसभरात काहीतरी चांगली बातमी मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे.
मकर (Capricorn) : चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका.
कुंभ (Aquarious) : उष्णतेच्या आजारांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया ओळखा. सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करता येईल. सुप्त चळवळेपणा कामाला लावा.आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. आयटी, बँकिंग तसेच सिनेमाशी संबंधित व्यक्तींना यश मिळेल. 12वी झाल्यानंतर चांगली वाटचाल कराल. श्वसनाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces) : खेळाडूंना चांगली संधी मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्णत्त्वाला जातील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. आळस झटकून कामाला लागावे. विरोधक माघार घेतील.आज विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागतील. बँकिंग तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्ती आपले टार्गेट पूर्ण करू शकतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. लवकरच प्रवासाचा योग येईल. घरातील व्यक्तींशी खटका उडेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणं टाळा.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद