कीर्तन सोहळ्याचा पहिला दिवस: कन्हैय्या डेअरी निघोज संस्थेच्या पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणानिमित्त भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन

0

निघोज: मळगंगा डेअरी फार्म, कन्हैय्या डेअरी निघोज या संस्थेचे पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाची धर्मचार्य हरी भक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तन सेवेने सुरुवात झाली.

फोटो-जयसिंग हरेल निघोज

तुमच्या विजयाची मिरवणूक ही तुमच्या हरण्याची नांदी सुरू झाली समजून जा. तुम्हाला जर जगायचं असेल तर आशा संपली की जगाची प्रगती संपते. आपले शांताराम मामा असतील बबन मामा असतील दोघांनी जे बीज लावलं, त्यांनी शून्यातून बीज निर्माण केलं पण संघर्षात हरले नाहीत. आज जे वैभव दिसतंय तुम्हाला जो कन्हैय्या परिवार जो आहे जिथे मच्छिन्द्र शेठ यांनी कळस केला महाराष्ट्रात एक चांगले उद्योजक म्हणून नावारूपास आले. नुसतं पैशाच्या मागे न लागता त्याला परमार्थाची जोड दिली. त्यातून लक्ष्मी सुद्धा भगवंता सहित इथे वास करते हे वैशिष्ट्य आहे. असे कीर्तन सेवेत शंकर महाराज शेवाळे यांनी निरूपण केले.

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा.लि (कैन्हया दुध) या संस्थेच्या पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणा निमित्ताने आयोजित भव्य कीर्तन महोत्सव २०२२ चा प्रारंभ शनिवार रोजी दिनांक  २६/३/२०२२ रोजी प्रारंभ झाला. हा सोहळा आठ दिवस असतो, हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा होत असतो. रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत कीर्तन सेवा चालू असते, कीर्तन सेवा झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सगळे भाविक रोज महाप्रसादाचा आनंद लुटतात. 

या कीर्तन सोहळ्याचा शेवट २/४/२०२२ ला काल्याच्या कीर्तनाने गुढीपाडव्याच्या दिवशी रामयनाचार्य हरी भक्त पारायण रामरावजी महाराज ढोक याच्या कीर्तन सेवेने होणार आहे.
फोटो-जयसिंग हरेल निघोज

फोटो-जयसिंग हरेल निघोज




यावेळी कन्हैय्या उद्योग समुहाचे संचालक शांताराम भाऊ लंके बबन भाऊ लंके कन्हैय्या समुहाचे अध्यक्ष मच्छिंद्र लंके, सोमनाथ वरखडे, शिवाजीराव वराळ, शिवशेठ लंके, भास्कर कवाद, संकेत लाळगे तसेच कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top