वाहनचालकांना दिलासा..! ‘या’ इंधनाच्या किंमती होणार कमी, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय..

0


इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलंय. रस्त्यावर वाहन चालवताना नागरिकांना आता हजार वेळा विचार करावा लागतो. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल इलेक्टाॅनिक वाहनांकडे वाढला.., तर काहींनी आपली पेट्रोल-डिझेलवरील वाहने ‘सीएनजी’ इंधनावर करण्यास सुरुवात केली..

सततच्या महागाईने पिचलेल्या वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.. महाराष्ट्रात येत्या 1 एप्रिलपासून ‘सीएनजी’ इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री, तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी ‘सीएनजी’वरील करात मोठी कपात करण्याचे सूतोवाच केले होते.

‘सीएनजी’वरील व्हॅट कमी
उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे, आता ‘सीएनजी’वरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन थेट 3 टक्के इतका कमी केला आहे. तशी अधिसूचना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. 25) जारी करण्यात आली. ‘व्हॅट’ कमी केल्याने साहजिकच ‘सीएनजी’च्या किंमती स्वस्त होणार आहेत.

पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. मूल्यवर्धित कराचा दर थेट 3 टक्क्यांवर आणला जाणार असल्याने ‘सीएनजी’च्या किंमती कमी होतील. त्यामुळे ‘सीएनजी’वर (CNG) वाहन चालवणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

वायू प्रदूषणाला अटकाव
दरम्यान, पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्या तुलनेत ‘सीएनजी’ इंधनामुळे प्रदुषण होत नाही. आता ‘सीएनजी’चे दर कमी झाल्याने, त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढू शकते. परिणामी, वायू प्रदूषणालाही अटकाव बसणार आहे.. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

महाराष्ट्रात आता ‘सीएनजी’ इंधन मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा, विशेषत: ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसह प्रवासी वाहतूक करणारी वाहनांना, तसेच खासगी वाहनधारकांना होणार आहे. या निर्णयाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Source


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top