कीर्तन सोहळ्याचा तिसरा दिवस: निस्वार्थ कर्म कराल तर भगवान परमात्मा तुम्हाला फलप्राप्ती दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे कन्हैय्या डेअरी- ह.भ.प. डॉ. कु. मोहिनीताई पाबळे

0



निघोज: आपण साधक आहोत साध्य पर्यंत जायचय साधक आणि साध्य यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जीच नाव आहे साधना ही साधना करत असताना अनुसंधान निच्छित साधला गेला पाहिजे अनुसंधान निच्छित साधल गेल तर प्रत्येकाला ज्ञानरूप दृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही.

कन्हैय्या डेरीचा सारखा विस्तार करणे ही काही सोपी गोष्ट नाही यासाठी कर्म करत असताना निस्वार्थ कर्म कराव लागत. निस्वार्थ कर्म कराल तर भगवान परमात्मा तुम्हाला फलप्राप्ती दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे कन्हैय्या डेअरी आहे. 


दरवर्षी मळगंगा डेअरी फार्म, कन्हैय्या डेअरी निघोज या संस्थेच्या वतीने भव्य कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांना कीर्तनातून मिळणार्‍या ज्ञानदानासोबतच रोज महाप्रसादाच्या रूपाने अन्नदान केले जाते. या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक येत असतात. कोरोनामुळे गेली २ वर्षात कोरोना नियमांमुळे हा कीर्तन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास बंधने होती. शनिवार पासून कीर्तन सोहळ्याला सुरुवात झाली असून सांगता ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रामयनाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल.मळगंगा डेअरी फार्म, कन्हैय्या डेअरी निघोज या संस्थेचे पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. तिसर्‍या दिवशीची कीर्तन सेवा ही शिवनेरी भूषण राजमाता पुरस्कार विजेत्या हरी भक्त परायण कु. डॉ. मोहिनीताई पाबळे यांच्या कीर्तन सेवेने झाली. 

या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले. 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top