एखाद्याची चूल पेटवता येत नसेल तर पेटवू नका पण पेटलेली गरिबाची चूल मात्र विजवू मात्र देऊ नका असे जीवन जगा एखाद्या गरिबाच्या टाटामध्ये घास वाढता येत नसेल तर वधू नका पण गरिबाच्या ताटातला घास हिरावून घेऊ नका तरच तुम्हाला ईश्वर मिळेल. कीर्तन सोहळ्याच्या चौथा दिवशी भागवताचार्य ह.भ.प. महेश महाराज साळुंखे यांचे कीर्तन झाले.
पारनेर तालुक्यतील निघोज येथील मळगंगा डेअरी (कन्हैय्या डेअरी ) चा पंचविसाव्या वर्षात पदार्पनानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत असतो. यावेळी कीर्तन ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक येत असतात. येणार्या भाविकांना कीर्तनातून मिळणार्या ज्ञानदानासोबतच रोज महाप्रसादाच्या रूपाने अन्नदान केले जाते.
कन्हैय्या उद्योग समूह हा अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध डेअरी प्लांट आईस्क्रीम, श्रीखंड, फ्लेवर्ड दूध, लोणी आणि तूप बनवणारा प्रतिदिन दूध उत्पादन करणारी कन्हैया डेअरी |
या कार्यक्रम प्रसंगी राजकीय, सामाजिक, उद्योग समूहातील अनेक मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.
या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद