शेतकऱ्यांसाठी मोठी योजना, ‘एक शेतकरी एक डीपी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकर करा अर्ज..

0



शेतकऱ्यांसाठी मोठी योजना, ‘एक शेतकरी एक डीपी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकर करा अर्ज..

शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देत असताना आणि इतर कामी विजेसंदर्भांत विविध अडचणी भासतात. अनेक ठिकाणी सध्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे, विद्युत पुरवठामध्ये दिवसातून बऱ्याच वेळा बिघाड होऊन वीज ग्राहक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, विद्युत अपघात अशा अनेक समस्या येत असतात. पण आता या समस्येतून शेतकरी बांधवांची मुक्तता होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या काही समस्या कमी करण्यासाठी उच्च दाबाची वीज शेतकऱ्यांना देण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोका अशा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्यात येत आहे. याविषयी आज तुम्हाला खास योजनेविषयी आम्ही माहिती देणार आहोत, ज्या योजनेमुळे तुम्हाला या समस्या उद्भवणार नाहीत.

राज्यात ‘एक शेतकरी एक डीपी’ योजना सुरु आहे. आतापर्यंत या योजनेचा 90 हजार हुन अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या नजीकच्या Csc केंद्रात जाऊनही तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, योजनेचे लाभ, अर्ज कुठे व कसा करायचा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार अशी माहिती आज जाणून घेऊ.

▪️ या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेतजमीन आहे, त्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
▪️ असे असले तरी अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति एचपी द्यावे लागणार आहेत.
▪️ कागदपत्रे कोणती आवश्यक: आधार कार्ड, मोबाईल नंबर, शेताचे 7/12 उतारा, जात प्रमाणपत्र, बँक खाते.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा..?

▪️ अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ –https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=Marathi वर क्लिक करा.
▪️ तिथे तुमची भाषा निवडा आणि खाली कृषी या पर्यायावर क्लिक करा.
▪️ नवीन अर्जाची नोंदणी हा पर्याय निवडा.
▪️ त्यानंतर किती HP ची DP हवी आहे (3/5/7) ते टाका.
▪️ पुढे ‘”कृपया शेती पंप वीज पुरवठ्यासाठी खालील पैकी योजना निवडा” यामध्ये दोन पर्याय दिसतील. 1) पारंपरिक वीजपुरवठा 2) सौर ऊर्जा तर आपल्याला या पैकी ‘पारंपरिक वीजपुरवठा’ हा पर्याय निवडायचा आहे.
▪️ त्यानंतर आपल्याला अटी आणि शर्ती यामध्ये दिसतील त्यामधला दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय म्हणजे ‘पारंपारिक विज जोडणी साठी लागणाऱ्या निधीची तरतूद शासनातर्फे अथवा महसुली जमा रकमेनुसार उपलब्ध कृषी आकस्मिक निधीमधून होईपर्यंत मी प्रतीक्षा करेन, प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार मला वीज जोडणी दिली जाईल हा पर्याय निवडायचा आहे.” मग सबमिट या बटन वर क्लिक करायचा आहे.
▪️ आता येणारा पर्याय वाचून ok बटन वर क्लिक करा.
▪️ पुन्हा तुम्हला 2 पर्याय दिसतील 1) individual 2) organization यापैकी पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
▪️ पुढील वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरा.
▪️ अर्जाच्या शेवटी Generate OTP यावर क्लिक करा. त्यानंतर अर्जात टाकलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी क्रमांक आपल्याला अर्जामध्ये भरायचा आहे. त्यानंतर ok करा.
▪️ अर्जाची तुम्ही प्रिंट तुमच्या जवळ ठेवा. तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर किंवा तुमच्या ई-मेल आयडीवर त्यासंबंधी एक मेसेज येऊन जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top