माजी सरपंच ठकाराम लंके यांच्या पॅनेलचे तीनही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय/ वाचा सविस्तर...

0

निघोज | महाराष्ट्र दर्शन न्युज

पारनेर तालुक्यातील निघोज येथील सोसायटी निवडणूक पार पडली. जागांसाठी १२ उमेदवार नशिब अजमावत होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांचा उमेदवारी अर्ज राहिला असला तरी मळगंगा पॅनेलला पाठींबा दिला होता. आठ जागांसाठी ११ उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. ८ जागांसाठी झालेल्या मतदानात मळगंगा पॅनेलचे पाच तसेच आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच ठकाराम लंके प्रणीत शेतकरी पॅनेलचे ३ उमेदवार विक्रमी मताधिक्य मिळवून विजयी झाले आहेत. १३ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. 



यामध्ये ठकाराम लंके प्रणीत शेतकरी पॅनेलचे तिन्ही उमेदवार जवळपास ४०० पेक्षा जास्त मताधीक्य मिळवून विजयी झाले आहेत, यामध्ये 

१) दत्तात्रय लंके १०५६

२) सुनिल वराळ १०४१ 

३)शांताराम लाळगे १०१६  

इतर मळगंगा पॅनेलचे पाच विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे 

१) रामदास रसाळ ८५० 

२) शिवाजीराव लंके ७८४ 

३) वसंतराव ढवण ७६३

४) संतोष लामखडे ७५१

५) शांताराम कवाद ७५० 

मळगंगा पॅनेलचे पराभूत उमेदवार विद्यमान चेअरमन बाळासाहेब लामखडे ६७४, माजी चेअरमन भाऊसाहेब कोल्हे ७४४, माजी उपाध्यक्ष गोरख ढवण ७४२

शनिवार दि.१२ रोजी झालेल्या निवडणुकीत मळगंगा पॅनेलचे ५ उमेदवार निवडून आले असले तरी माजी सरपंच ठकाराम लंके प्रणीत शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांची मतांची विक्रमी आघाडी घेत जल्लोष साजरा केला आहे. 

१३ जागांपैकी ५ बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे :

१) हिराभाउ सोनवणे 

२) सुनिल वराळ 

३)असिम हवालदार 

४) मंदा अशोक ढवळे 

५) मनिषा नाना वराळ 

हे राखीव जागेसाठी असलेले उमेदवार मात्र बिनविरोध निवडून आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top