निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विद्यमान चेअरमन सुनील काशिनाथ वराळ व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यावतीने कुंड रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारनेर येथे व आमदार निलेश लंके यांना पत्र व्यवहार केला यावेळी निघोज ग्रामपंचायतचे सदस्य दिगंबर लाळगे, गणेश कवाद व प्रगतशील शेतकरी संदीप वराळ उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पारनेर चे संबंधित वरिष्ठ लिपिक अधिकारी श्री.सुनील होळकर यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
मळगंगा माता यात्रेच्या पार्श्वभूमीवर निघोज कुंड रस्ता दुरुस्तीची केली मागणी.
मार्च ३१, २०२२
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद