यंदा कसा असेल मॉन्सून? शेतीवर काय परिणाम होणार, जाणून घ्या..

0



सध्या तापमान वाढत आहे आणि जसजसा हवामान बदल होईल तसतसा मॉन्सूनवर परिणाम जाणवेल. मार्च महिन्याचा शेवट आज होत आहे. पण गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात उन्हाळा पूर्ण जोमात येत आहे, असं वाटत आहे. कुठे पावसाची प्रक्रिया सुरू आहे, तर कुठे उष्णतेची लाट आपला प्रकोप दाखवत आहे. त्यामुळे लोकांना दुपारी घरातच राहावे लागत आहे. आता उष्माघाताने राज्यात जळगावमध्ये एक बळी गेल्याची बातमीही समोर आली आहे. आता राज्यामध्ये कडक ऊन आणि उष्ण वाऱ्याने लोकांचे हाल व्हायला सुरु झाले आहेत.

शेती पिकाला आधीच नुकसान सोसावं लागत आहे आणि आता अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे अजूनही नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पेरणी, लागवड करण्यासाठी असो वा उगवलेली सर्व पिके असो ही आता मान्सूनच्या आगमनावर अवलंबून राहणार आहेत. जर आपण मध्य भारतातील राज्यांबद्दल बोललो तर ते पावसावर अवलंबून असलेल्या शेतजमिनींनी भरलेले आहे. एकूणच, मॉन्सून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या पेरणीसाठी खूप मदत करतो. बहुतांश शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीची तयारी सुरू करतात.

देशात मॉन्सूनचे आगमन, त्याची तीव्रता, कालावधी आणि माघार यामध्ये प्रत्येक वर्षी चढ-उतार होत असतात. कधी मॉन्सूनला म्हणजेच मॉन्सूनच्या पावसाला उशीर होतो तर कधी तो लवकर येतो. यासोबतच सरासरीपेक्षा जास्त पाऊस कधीतरी पडणे अशा काही गोष्टींवर शेतातील पिकांचे फायदा नुकसान ठरलेले असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे चांगले उत्पादन येईल की नुकसान होईल यावर येणार पैसा अवलंबून असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मान्सूनचा अंदाज जाणून घेणे गरजेचे आहे.

आता यंदाच्या मॉन्सूनबद्दल सांगायचं झालं तर स्कायमेटच्या अंदाजानुसार, या वर्षीचा मॉन्सून शेतकऱ्यांना दिलासादायक असणार आहे, कारण यावर्षीचा मॉन्सून मागील काही वर्षानंतर यंदा सामान्य राहू शकतो. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मॉन्सून सामान्य राहू शकतो. त्याचबरोबर आता सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. स्कायमेटने असेही म्हंटले आहे की, मान्सूनबद्दल अनेक राज्यांतील, किंवा हवामानाबद्दल अधिक तपशील सध्या स्कायमेट गोळा करतं आहे. हा तपशील आल्यानंतर एप्रिलमध्ये अंदाजाचा सविस्तर अहवाल जारी केला जाणार आहे. स्कायमेटने वर्तवलेला हा प्राथमिक अंदाज आहे, असं सांगितलं आहे.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top