देशात मार्च महिन्याअंती बरीच कामे राहून जातात. जर तुमची बँकांची कामं राहिली असतील किंवा आधार-पॅन लिंक करायचे राहिले असेल तर ते आज करून घ्या. याशिवाय पैसे काढणे-भरणे, चेकविषयी कामे व इतर कामे पुढील महिन्यात सुट्ट्यांचे नियोजन पाहून करून घ्या. कारण यानंतर एप्रिल महिन्यामध्ये अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे.
एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in April 2022):
1 एप्रिल – मागील सरत्या आर्थिक वर्षाचा हिशेब करण्यासाठी काही बँका सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहतील.
2 एप्रिल – महाराष्ट्रात मराठी नववर्ष सुरू होत असल्याच्या दिवशी म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीमुळे बँका बंद राहतील. तर याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात उगाडी सणानिमित्त बँकांना सुट्टी आहे.
3 एप्रिल – गुढीपाडवा सण झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच रविवार येतो, त्यामुळे बँकाना सुट्टी आहे.
9 एप्रिल – तसेच, दुसरा शनिवार असल्याने 9 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी राहणार आहे.
10 एप्रिल – दुसरा रविवार (रामनवमी) असल्यामुळे बँकांना 10 एप्रिल रोजीही सुट्टी असणार आहे.
14 एप्रिल – राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलला असते, यावेळी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महावीर जयंती, वसंत पंचमी, बैसाखी, तामिळ नवीन वर्षानिमित्त ही राष्ट्रीय सुट्टी असेल.
15 एप्रिल – गुड फ्रायडेनिमित्तही बँकांना सुट्टी असते.
23 एप्रिल – एप्रिल महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.
24 एप्रिल – महिन्यातील चौथा रविवार असल्यामुळे बँकेला 24 एप्रिल रोजीही सुट्टी असणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद