आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन सुनीलजी वराळ व व्हा.चेअरमन वसंत ढवण यांचा सन्मान

0



निघोज सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनिल काशिनाथ वराळ तसेच उपाध्यक्षपदी वसंतराव काशिनाथ ढवण यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी एक एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.  सोसायटीमध्ये  आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सुनिल वराळ व वसंतराव ढवण यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.

पारनेर तालुक्याचे लोकनेते आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन सुनीलजी वराळ व व्हा.चेअरमन वसंत ढवण यांचे कौतुक करत सन्मान करण्यात आला. यावेळी निघोज ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद सर, मा.सरपंच ठकाराम लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त अमृताशेठ रसाळ, सामाजिक कार्यकर्ते बबनराव कवाद, विठ्ठल कवाद,पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत लंके, निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे मा.व्हा.चेअरमन अंकुश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे, रोहिदास लामखडे, निघोज वि.का.से.स.सोसायटीचे विद्यमान संचालक दत्तात्रय लंके, शांताराम लाळगे, असिम हवालदार व प्रगतशील शेतकरी दिलिप कवाद, सत्यम निमसे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top