![]() |
उठा जागे व्हा आणि प्रयत्न करा. आपल्या प्राप्त्य वस्तु करिता आपल्या ध्येयासाठी आपण आपल्या जीवनामध्ये जे ध्येय ठेवले असेल त्या ध्येयाकडे पाहून आपल्या जीवनाची वाटचाल प्रयत्न पूर्वक केली पाहिजे. प्रयत्न मात्र केले पाहिजेत प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट आपल्या हाताला लागत नाही.
आपल्याला कोणतीही गोष्ट सहज आणि सोप्या पद्धतीने भेटली तर आपण प्रयत्न करणार नाही म्हणजे आपण निष्क्रिय बनू. असे हरी भक्त परायण श्रीजयेश महाराज भाग्यवंत यांनी निरूपण करताना म्हटले.
मळगंगा डेअरी (कन्हैय्या डेअरी ) चा पंचविसाव्या वर्षात पदार्पनानिमित्त कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने पाचव्या दिवशी हरी भक्त परायण श्रीजयेश महाराज भाग्यवंत यांची कीर्तन सेवा झाली.
कन्हैया उद्योग सर्वेसर्वा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो परमश्रद्धे आदरणीय शांताराम मामा लंके, परमश्रद्धे आदरणीय बबनमामा लंके आणि परमश्रद्धे आदरणीय मच्छिंद्र लंके अथक प्रयत्नातून संपन्न होत असलेला हा उत्सव आहे. या उत्सवाची पर्वणी ते आपल्याला देत आहेत म्हटल्यावर त्यांचे आभार जेवढे व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत. या कीर्तन सोहळ्याची आठ वाजताची जी वेळ आहे ती आपली वेळ सत्कारणी लावण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. असेही हरी भक्त परायण श्रीजयेश महाराज भाग्यवंत यांनी निरूपण करताना म्हटले.
कन्हैय्या उद्योग समूह हा अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध डेअरी प्लांट आईस्क्रीम, श्रीखंड, फ्लेवर्ड दूध, लोणी आणि तूप बनवणारा प्रतिदिन दूध उत्पादन करणारी कन्हैया डेअरी |
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद