लिंबाला सध्या सोन्याचे दिवस येऊ लागले आहेत. मागील वर्षी पेक्षा चालू वर्षी लिंबाला चांगला बाजारभाव मिळू लागल्यामुळे शेतकरी समाधानी होऊ लागले आहेत.
यावर्षी लिंबाने शंभरी पार केली आहे. आज लिंबाच्या चांगल्या प्रतीच्या मालाला१२५ रुपये प्रति किलो भाव मिळाला तर सर्वसाधारण १२०रुपये किलो. कमीत कमी ११५ रुपये प्रती किलो भाव मिळाला आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्यामुळे पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. परिणामी फळबागांना पाणी कमी पडू लागल्याने उत्पन्न कमी होऊ लागले असल्यामुळे लिंबाची परराज्यात मागणी वाढू लागली असल्यामुळे भाव ही तेजीत आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद