मोदी सरकार लवकरच आणणार ‘सुपर अ‍ॅप’; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा..!

0



शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने विविध कृषी योजना सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक महत्वाचा उपक्रम मोदी सरकार घेऊन आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे..

शेतीतून विकास साधायचा असेल, तर शेतकऱ्याला ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’शी जोडणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन, मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी ‘सुपर अ‍ॅप’ तयार करण्याचं काम करीत आहे. सरकारकडून लवकरच हे ‘अ‍ॅप’ लाॅंच केलं जाणार असल्याचं समजतं..

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ‘सुपर अ‍ॅप’ तयार करण्याचं काम सुरू आहे. खरं तर गेल्या काही दिवसांत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाय. इंटरनेटचा वापर वाढलाय.. ही बाब लक्षात घेऊन मोदी सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध ‘अ‍ॅप’ लाँच केले आहेत.

मात्र, आतापर्यंत एखाद्या विशिष्ट गोष्टींसाठीच हे ‘अ‍ॅप’ तयार करण्यात आले. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे ‘अ‍ॅप’ वापरावे लागतात. त्याऐवजी एकच सर्वसमावेशक ‘अ‍ॅप’ असावंतयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ‘सुपर अ‍ॅप’ तयार केलं जात आहे. या एकाच ‘अ‍ॅप’वर शेतकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळणार आहेत..

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ‘सुपर अ‍ॅप’च्या कामाचा आढावा घेतला. येत्या काही आठवड्यातच हे ‘अ‍ॅप’ लाॅंच केलं जाणार असल्याचे सांगण्यात आलं.

शेतकऱ्यांचा काय फायदा होणार..?
– पिकाबाबत मार्गदर्शन, उत्पादन, कापणीनंतरचं व्यवस्थापन, हवामान नि बाजारातील अपडेट्स, अशा साऱ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘सुपर अ‍ॅप’ लाॅंच केलं जाणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना या अ‍ॅपच्या माध्यमातून सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या योजना, घोषणा नि अ‍ॅडव्हायजरींची माहितीही मिळणार आहे.

– किसान सुविधा, पुसा कृषी, एम. किसान, शेतकरी मासिक अ‍ॅप, फार्म-ओ-पीडिया, पीकविमा अ‍ॅप, कृषी मार्केट, इफ्को किसान आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी ज्ञानासह अनेक अ‍ॅप्सचं मिळून हे एकच सर्वसमावेशक ‘अ‍ॅप’ असेल.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top