संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. कारण हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाची कमाई 6 दिवसात 100 कोटींच्या जवळ गेली आहे.
पहिल्या आठवड्यानंतर सोमवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. जवळपास 650 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता 2000 पेक्षाही जास्त स्क्रीन्सचा टप्पा गाठला. ‘ द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files Box office Collection) पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची रोज गर्दी होत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईचा आकडा दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिला, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी नवे विक्रम करेल, असं दिसत आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ रिलीजच्या 6व्या दिवशी, चित्रपटाने 19.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची बॉक्स ऑफिसमध्ये एकूण कमाई 79.25 कोटी रुपये झाल्याचं समोर आलं आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी मध्ये काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांनी अतिशय सुरेख भूमिका केल्या आहेत.
बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई!
सर्वच ठिकाणी चर्चेत असणाऱ्या जागतिक बॉक्स ऑफिसवर ‘द कश्मीर फाइल्स’ ने पाचव्या दिवशी चित्रपटानं सर्वाधिक म्हणजेच तब्बल 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहाव्या दिवशी त्यात प्रचंड वाढ दिसून आली. चित्रपटाने सहाव्या दिवशी 19.05 कोटी रुपयांची कमाई केली व जगातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल 79.25 कोटी रुपये झाले आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने बनविलेल्या या चित्रपटाचा दुसऱ्या आठवड्यातील गल्ला पहिल्या आठवड्यातील कमाईपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान 12 मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर अनेकांनी हा चित्रपट पाहिला. तसेच या चित्रपटाच्या यशासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या या चित्रपटाचे लोक प्रचंड कौतुक करत आहेत आणि थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद