‘हिरोपंती 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, टायगर ‘या’ अतरंगी व्हीलनसोबत भिडणार, पाहा व्हिडीओ..

0

‘हिरोपंती 2’ (Heropanti 2) चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांना चित्रपटाची एक झलक पाहण्याची उत्सुकता होती, ती अखेर संपली आहे. कारण निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या बहुप्रतीक्षित हिरोपंती 2 चा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांची लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी दिसणार आहे.

तुम्हाला आठवत असेलच की, 2014 साली ‘हीरोपंती’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातून टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘हिरोपंती 2’ हा याच चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात स्टंट आणि मनोरंजनच नव्हे तर अ‍ॅक्शनचा धमाकाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ईदला, 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

आगामी ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची वेगळी छटा पाहायला मिळणार आहे. तो मुख्य भूमिकेत म्हणजेच लैला नावाच्या अतरंगी भूमिकेत दिसणार आहे. या जबरदस्त चित्रपटात टायगर श्रॉफ बबलूचा रोल करणार असून चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येते की, हा चित्रपट हिट होऊन कमाईच्या बाबतीत 100 कोटी क्लब मध्ये एंट्री करू शकतो.

तुम्हालाही हा धमाकेदार ट्रेलर पाहायचा असेल, तर 3 मिनिटे 20 सेकंदाचा हा ट्रेलर Youtube वर ‘NadiadwalaGrandson’ असं सर्च करून ‘Heropanti 2’ चा Trailor पाहता येणार आहे. यात तारा सुतारियाचा आणि टायगरचा अंदाच खुपच विशेष दिसत आहे. यासोबतच नवाजुद्दीन सिद्दीकीचे डायलॉग्ज प्रेक्षकांना आवडणार हे तर नक्की आहे. यासोबतच चित्रपटात अनेक वेळेस दिसणारी अ‍ॅक्शन दृश्ये आपलं मनोरंजन करणार आहेत.

Source


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top