महाराष्ट्र दर्शन न्यूज | निघोज | प्रतिनिधी सागर आतकर
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी फार मोठे सामाजिक व शैक्षणिक योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचे अनुकरण हीच त्यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बौद्ध महासभेचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
निघोज ग्रामपंचात व ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, बाबाजी वाघमारे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सुलतान सय्यद, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, युवा नेते अक्षय वरखडे, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांना समान न्याय व संधी मिळण्यासाठी तसेच स्त्रीयांना शिक्षण मिळण्यासाठी महात्मा फुले यांनी समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. आज त्यांच्याच शिकवणूकीने आपले राज्य संपन्न व सुसंस्कृत झाले आहे. आजच्या युवापिढीने त्यांचेच अनुकरण करण्याची गरज आहे. - बाबाजी वाघमारे (अखिल भारतीय बौद्ध महासभेचे पारनेर तालुका अध्यक्ष)
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच माऊली वरखडे यांनीही आपले विचार मांडले.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वतःचं जीवन समाजसुधारणेसाठी वाहून घेतलं होतं. समाजासाठी आपली बांधिलकी त्यांनी जपली. त्यांच्या या महान कार्यातून पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा मिळत राहील.- उपसरपंच माऊली वरखडे
महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी देशात सर्व प्रथम शाळा सुरू केली. यातूनच त्यांनी समाजातील जातीयवादाला छेद दिला. समाजातील भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न केला.- सचिन पाटील वराळ (संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद