महाराष्ट्र दर्शन न्यूज | पारनेर | प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच विठ्ठलराव सरडे, उपसरपंच सुलोचनाताई वाढवणे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व संस्थाचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. ज्योतिबा फुलेंनी स्वतःचं जीवन समाजसुधारणेसाठी वाहून घेतलं होतं. समाजासाठी आपली बांधिलकी त्यांनी जपली. त्यांच्या या महान कार्यातून पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा मिळत राहील.- विठ्ठलराव सरडे (सरपंच)
महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी देशात सर्व प्रथम शाळा सुरू केली. यातूनच त्यांनी समाजातील जातीयवादाला छेद दिला. समाजातील भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न केला. - सुलोचनाताई वाढवणे (उपसरपंच)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद