राज्याला उन्हाचा तडाखा बसणार, कुठे उष्णतेची लाट अन् कुठे पाऊस, वाचा..

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज | महाराष्ट्र |

राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील अनेक जिल्हयातील पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वत्रच उन्हापासून नागरिक खूपच त्रासले आहेत. आता हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीनं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

रविवारी अकोल्यात 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. राज्यातील या ठिकाणच्या किमान तापमानात आता यंदा सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. असा अंदाज आहे की, 12 एप्रिलपासून विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज आहे.

एकीकडे राज्यात कोकणात अवकाळी पावसाचं संकट आहे तर दुसरीकडे उन्हाच्या तीव्र झळा कायम आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा 39 अंशापासून 45-46 अंशापर्यंत जाईल असा अंदाज सांगण्यात आला आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला असून राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यासोबतच राज्यात 11 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण आणि यांसह वाऱ्याचा वाढता वेग राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राज्यात परिस्थितीनुसार 38 अंशांच्या पुढे उन्हाचा पारा वाढू शकतो. आज मध्य महाराष्ट्र आणि कोकण मधीक काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज (ता. 11 एप्रिल) सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लामपूर, रत्नागिरी, चिपळूण, वाई, सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज आहे, तर येथील काही ठिकाणी पाऊसही येण्याचं सांगण्यात आलंय.

अशा वातावरणामुळे राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळं वातावरण असून काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार पाऊसदेखील झाला आहे. असे संमिश्र हवामान असताना उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवामान विभागामार्फत अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आला आहे. शरीरात पाण्याची मात्र योग्य राहण्यासाठी पाणी भरपूर पिण्यास सांगण्यात आलं आहे. उन्हाळ्यात थंडावा देणारे कपडे घालण्यास सांगितलंय. दुपारी शक्यतो बाहेर जाणे टाळावे. उन्हाळा जाताना डोक्यावर टोपी, रुमाल घ्यावा, असं वारंवार सांगितलं गेलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top