‘झेंडू’ नाव घेतलं की, आठवतो तो दसरा, होळी आणि दिवाळी. अशा महत्वाच्या सणांना तोरण बांधण्यासाठी मोठा वापर झेंडूच्या फुलांचा होतो. झेंडू आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात व संपूर्ण जगात महत्त्वाचे फुल आहे. झेंडूच्या फुलाचा उपयोग अनेक मोठ्या सणांना होतो.
झेंडूच्या फुलांचा उपयोग कुंडीत लावण्यासाठी करता येतो. याशिवाय घरातील देवांचे फोटो असतील वा इतर फोटो असतील त्यांना लावण्यासाठी, कार्यक्रमांमध्ये, समारंभांसाठी, रोज कुठे ना कुठे होत असलेल्या कार्यक्रमांत शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छामध्ये वापरण्यासाठी, औषधांसाठी असे अनेक उपयोग होतो.
राज्यात झेंडूचे पीक उन्हाळी, पावसाळा व हिवाळा अशा तिन्ही हंगामात (Marigold Flower Farming) घेतात, म्हणून वर्षभर चालणाऱ्या या फुलांना खूप मागणी असते. झेंडूच्या फुलाला बाजारभाव लवकरच आणि जास्त मिळतो. झेंडूच्या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात, त्या पाकळ्यांचा उपयोग करून कॅरोटीनॉइड रसायन तयार करतात. कोंबडी खतात हे रसायन मिसळतात. यामुळे अंड्याच्या बलकाचा दर्जा सुधारतो.
झेंडूपासून बनवलेल्या रसायनाचा किंवा रंगाचा सौंदर्यप्रसाधन व बऱ्याच गोष्टींसाठी केला जातो. कर्करोगावर उपचारासाठीही यापासून रंगद्रव्य बनवून औषधीमध्ये वापरले जाते. भाजीपाला व काही पिकांमध्ये सूत्रकृमी नियंत्रित करण्यासाठी झेंडूचे मिश्र पीक घेतात. खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठीही झेंडूच्या फुलांचा उपयोग होतो.
झेंडूच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?
1) आफ्रिकन झेंडू : या आफ्रिकन झेंडू या जातीचे झुडपे उंच वाढतात. या झुडप्याला काटे असतात. पावसाळी हवामानात झुडपे 100 ते 150 सें.मी.पर्यंत या आफ्रिकन झेंडू ची उंची वाढते. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो. उंची जास्त असल्याने फुलांची संख्याही वाढते. झेंडूंच्या फुलांचे हेक्टरी 12 ते 15 टन उत्पादन मिळू शकते.
2) पुसा नारंगी (क्रॅकर जॅक जर गोल्डन जुबिली): या जातीला लागवडीनंतर 123-136 दिवसानंतर फुले येतात. झुडुप 73 से. मी. उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व 7 ते 8 से. मी. व्यासाची असतात. अशा काही संकरीत जातींची लागवड केल्यास प्रति हेक्टरी 18 ते 20 टन उत्पादन मिळते.
झेंडूच्या लागवडीपूर्व जमिनीची 2 ते 3 वेळा खोलवर नांगरट, 2 ते 3 वेळा फणणी करून धसकटे व हरळीच्या काशा वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून 50 किलो नत्र, 200 किलो. स्फुरद व 200 किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीच पूर्णपणे मिसळून घ्यावे व संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र 250 किलो, स्फुरद 400 किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावी. यानंतर 60 से. मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून सोयीप्रमाणे वाफे करून घ्यावेत. 60 X 30 से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी अंदाजे 40,000 रोपे लावता येतात.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद