येणाऱ्या काळात आपण जामगाव या गावचा मोठ्या प्रमाणात विकास करणार - अरुणाताई खाडे (लोकनियुक्त सरपंच जामगाव)

0





महाराष्ट्र दर्शन न्युज |जामगाव |प्रतिनिधी : निलेश जाधव

पारनेर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून जामगाव या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन उदघाटन करण्यात आले. पारनेर जामगाव भाळवणी पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून जामगाव घाट सोबलेवाडी तलावाचे दुरुस्तीसाठी 34 लक्ष रुपये मंजुरी करण्यात आले. यावेळी आमदार निलेशजी लंके व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुनंदाताई सुरेशशेठ धुरपते व जामगावच्या सरपंच अरुणाताई भाऊसाहेब खाडे व ग्रामस्थ यांच्या हस्ते आमदार निलेश लंके व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीच्या उपसभापती सूनदाताई सुरेशशेठ धुरपते व जामगावच्या सरपंच अरुणाताई भाऊसाहेब खाडे (प्रथम लोकनियुक्त सरपंच) यांच्या  पाठपुराव्यामुळे जामगाव या ठिकाणी भरघोस निधी उपलब्ध होवून पाझर तलाव तसेच रस्त्यांची अनेक कामे मार्गी लागली आहेत. 


तसेच येणाऱ्या काळात आपण जामगाव या गावचा मोठ्या प्रमाणात विकास करणार आहे. अशी प्रतिक्रिया सरपंच अरुणाताई खाडे यांनी दिली. तर या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदाताई सुरेशशेठ धुरपते, वाघुंडे गावचे सरपंच संदीप मगर, सरपंच अरुणताई भाऊसाहेब खाडे (प्रथम लोकनियुक्त सरपंच), उपसरपंच सोन्याबापु शिंदे,  माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, विजय डोळे, ग्रामविस्तार अधिकारी शेलार, लिपिक सुदर्शन खामकर तसेच जामगाव सरपंच उपसरपंच  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top