पेट्रोल-डीझेल धावतंय उसेन बोल्टपेक्षाही जास्त जोरात; वाचा, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात काय आहेत भाव

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई :

रोज उसेन बोल्टपेक्षाही जास्त वेगाने धावणारे पेट्रोल-डीझेलचे भाव आज जरा स्थिरावले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol Diesel Price Today) जनतेला दिलासा दिला आहे. अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले भाव आज वाढलेले नाहीत.

गुड रिटर्न्स वेबसाईटकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.41 वर आहेत. तर डिझेलचे दर 96.67 रुपयांवर आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रलचा दर प्रति लिटर 120.51 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर असून डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर झाले आहे. 22 मार्चपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14 वेळा वाढ केली आहे (Hike in Petrol Diesel Price). या काळात दोन्ही प्रकारचे इंधन सुमारे 10 रुपयांनी महागले आहे.

आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपयांवर आहे. नागपूरमध्ये पेट्रोल 120.47 रुपये लिटर तर डिझेल 103.19 रुपये लिटर असून कोल्हापूरमध्ये पेट्रोल 120.11 रुपये लिटर आणि डिझेल 102.84 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल 120.13 तर डीझेल 102.84 आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 120.27 रुपये लिटर तर डिझेल 102.97 रुपयांवर पोहोचले आहे.

तुम्हीही घरबसल्या जाणून घेऊ शकता दर :-

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. तर HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top