महाराष्ट्र दर्शन न्यूज | निघोज | प्रतिनिधी- सागर आतकर
तुम्ही किती श्रीमंत यापेक्षा तुमच्यात दातृत्व किती आहे इथून परमात्माची सुरुवात होते. त्याचे उदाहरण म्हणजे शांताराम मामा लंके, बबनमामा लंके, मच्छिंद्र लंके व कन्हैया परिवार आहे. परमात्मा सर्वांकडे पैसे देत नाही पण ज्यांच्याकडे देतो त्यांच्याकडे सर्वांना दातृत्व बुद्धी देत नाही. पण ज्याला ईश्वराने श्रीमंती दिलेली असेल आणि दातृत्व दिलेले असेल परमात्मा तिथे अखंड निवास करत असतो.
व्यक्ति मोठा होतो व्यक्ति मोठा असतो पण का असतो का मोठा होतो यामागे कोणाचे तरी उपकार असतात. यामागे कोणाचे तरी आशीर्वाद असतात. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद असल्याशिवाय छोटा मोठा बनत नाही.
भगवान नारायणची एक विशेषता आहे जो मागत नाही त्याला देतो आणि जो मागतो त्याला देतो पण त्याच देतो त्याला देत नाही. देवाला मागणारा जो आहे तो जर देवालाच मागणारा असेल तर देव स्वतःला देऊन टाकतो. ईश्वरची कृपा फार महत्वाची संतांची कृपा फार महत्वाची ज्याच्या जीवनामध्ये संत कृपा असेल त्याच्या जीवनामध्ये सर्व काही आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये संतकृपा नसेल तर तो दरिद्री. हरी भक्त परायण भागवतचार्य जनार्दन महाराज आरावेकर यांनी निरूपण करताना संगितले.
मळगंगा डेअरी (कन्हैय्या डेअरी ) चा पंचविसाव्या वर्षात पदार्पनानिमित्त कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने सहाव्या दिवशी हरी भक्त परायण भागवतचार्य जनार्दन महाराज आरावेकर यांची कीर्तन सेवा झाली.
पारनेर तालुक्यतील निघोज येथील मळगंगा डेअरी (कन्हैय्या डेअरी ) चा पंचविसाव्या वर्षात पदार्पनानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत असतो. यावेळी कीर्तन ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक येत असतात. येणार्या भाविकांना कीर्तनातून मिळणार्या ज्ञानदानासोबतच रोज महाप्रसादाच्या रूपाने अन्नदान केले जाते.
कन्हैय्या उद्योग समूह हा अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध डेअरी प्लांट आईस्क्रीम, श्रीखंड, फ्लेवर्ड दूध, लोणी आणि तूप बनवणारा प्रतिदिन दूध उत्पादन करणारी कन्हैया डेअरी |
या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद