शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना, आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला सरकार देणार अनुदान..

0


महाराष्ट्र दर्शन न्यूज

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना अनेक योजना राबवत लाभ देत असते. देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा 17 ते 18 टक्के आहे. असं असलं तरी अनेक अडचणींचा सामना करत, नुकसान सोसत शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा पैसा उभारावा लागतो. आर्थिक मदतीसंबंधी विविध शेतकरी अनेक योजनांचा लाभ घेऊन अनुदान किंवा आर्थिक मदत मिळवत असतात. आजही आम्ही तुम्हाला अशा योजनेबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होणार आहे. यासोबतच पैशांची जास्त बचतही होणार आहे.

शेतीतील खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळही शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा लागत नाही. त्यामुळे एक मोठी योजना सरकारने सुरु केली आहे. यामध्ये भारतातील कोणतेही शेतकरी या ‘स्माम योजना’ नावाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते. शेती पद्धती आधुनिक करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून देशाची प्रगती होवो, म्हणून सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देत असते. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के पर्यंत सवलत मिळू शकते. चला तर जाणून घेऊ त्या योजनेविषयी..

‘स्माम’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

▪️ बँक पासबुक
▪️ मोबाईल क्रमांक
▪️ आधार कार्ड
▪️ सातबारा उतारा
▪️ वास्तव्याचे प्रमाणपत्र
▪️ जातीचा दाखला
▪️ पासपोर्ट साईझ फोटो

स्माम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

▪️ सर्वात आधी https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉग इन करा.
▪️ मग आता योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा.
▪️ यांनतर तुम्ही शेतकरी हा पर्याय निवडा.
▪️ मग पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल.
▪️ आता तुम्हाला तिथे तुमची नोंदणी करावी लागेल.
▪️ नाव आणि आधार कार्ड क्रमांक तिथे भरा.
▪️ तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागेल.
▪️ आता शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top