पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा.लि (कन्हैया दुध) या संस्थेच्या पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पणा निमित्ताने आयोजित भव्य कीर्तन महोत्सव २०२२ चा शनिवार रोजी दिनांक २६/३/२०२२ रोजी प्रारंभ झाला. हा सोहळा गेली सात दिवस मोठ्या आनंदात उत्साहात साजरा झाला. रोज संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा झाली. रोज कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद श्रोत्यांनी घेतला. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कीर्तन सोहळ्याचा शेवट रामयनाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाला.
यावेळी ढोक महाराज म्हणतात,
श्रीमंत बापाने लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसा हा कन्हैय्या डेअरीचा ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम आहे. आज आनंदाचा दिवस आहे मराठी वर्षाचा शुभारंभ आहे. कोरोना काळात दोन तीन वर्ष जी हानी झाली ते पाहता आपल्या पुन्हा भेटी घडवून आणल्या त्या परमेश्वराने, ती प्रभूची कृपा आहे. या काळात सगळ्या क्षेत्रात हानी झाली. राजकीय क्षेत्रातले गेले, परमार्थिक क्षेत्रातील गेले. मोठे मोठे महात्मे गेले. आपण चिंतन करायचं की येवढ्या महामारीतून देवाने आपल्याला ठेवलं ते आपल्या सर्वांच्या भेटीसाठी. यावेळी ढोक महाराज कन्हैया मिल्क अँड अग्रो प्रोडक्टचे संस्थापक शांताराम मामा लंके यांना म्हटले की " शांताराम मामा तुमचा श्रीकृष्णाकडे चांगला वशिला आहे. आमची वारकर्यांच्या वतीने तुम्ही तुमच्या कन्हैय्याला एक विनंती सांगा की आता असे काही दिवस (कोरोना ) परत दिसू देऊ नकोस."
कन्हैय्या उद्योग समूह हा अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध डेअरी प्लांट आईस्क्रीम, श्रीखंड, फ्लेवर्ड दूध, लोणी आणि तूप बनवणारा प्रतिदिन दूध उत्पादन करणारी कन्हैया डेअरी |
या कीर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद