भारतातील बहुतांश जणांना परिचित असणारे न्यूज एग्रीगेटर ॲप डेलीहंट (ज्यावर तुम्ही न्यूज आणि इतर अनेक गोष्टी वाचतात.) आणि शॉर्ट व्हिडीओ जोश ॲपची मालकी असणारे VerSe Innovation यांनी $805 दशलक्ष गुंतवणूक उभी केली आहे.
VerSe Innovation यांनी म्हटलं की, 6 एप्रिल रोजी सांगितले की, अलीकडच्या काही महिन्यांत समभागांवर दबाव येत असतानाही गुंतवणूकदारांची भावना मजबूत राहिल्याने त्यांनी $5 अब्जच्या व्हॅल्यूएशनने $805 दशलक्ष उभारले आहेत. डेलीहंटच्या या पॅरेंट कंपनीचे $805 दशलक्ष आतापर्यंत या यादीत टॉपवर आहे, त्यानंतर स्विगी कंपनीने $700 दशलक्ष जमा केले आहेत. $400 दशलक्ष पेक्षा जास्त कमावलेल्यांमध्ये पॉलिगॉन, बायजू आणि युनिफोर हे स्टार्टअप्स समाविष्ट आहे.
गुप्ता आणि बेदी यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की, “आमची ही भागीदारी आम्ही पुढील करोडो वापरकर्त्यांना सेवा देणार्या आमच्या ॲप्ससाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या (artificial intelligence/machine learning – AI/ML) क्षमतांना मजबूत करण्यासाठी तसेच लाइव्ह स्ट्रीमिंग व वेब 3.0 सारख्या विविध प्रयोगांमध्ये वापरणार आहे. AI वर चालणारे स्थानिक भाषा सामग्री प्लॅटफॉर्म तयार करण्याचा आमचा विचार आहे”, असं ते म्हणाले.
तुम्हाला माहीतच असेल की Newshunt नावाने एक ॲप पूर्वी लॉंच होते तर त्याचेच नाव मागील काही वर्षांपासून Dailyhunt असं करण्यात आलं आहे. कंपनीच्या डेलीहंटचे 350 दशलक्ष पेक्षा जास्त युझर्स आहेत. जोश या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मचे 150 दशलक्ष मासिक सक्रिय युझर्स आहेत.
कमी कालावधीत यशस्वी झालेली कंपनी VerSe Innovation ची स्थापना वीरेंद्र गुप्ता आणि शैलेंद्र शर्मा या दोघांनी मिळून 2007 मध्ये केली होती. उमंग बेदी फेब्रुवारी 2018 मध्ये या फर्ममध्ये सामील झाले. अतिशय जबरदस्त वापरकर्ते असलेले TikTok जेव्हा भारतात बंद झाले तेव्हा कंपनीने संधी शोधत 2020 मध्ये शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Josh App लाँच केलं आणि त्याचे आता लाखो युजर्स आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद