टाटा कंपनीच्या ‘या’ सुपर अ‍ॅपची होतेय चर्चा, देणार अ‍ॅमेझॉन, जिओ, पेटीएमला टक्कर..

0



सध्या आयपीएलमध्ये एका ब्रॅण्डचं नाव वारंवार दिसून येतंय, ते म्हणजे टाटा न्यू (एनईयू). Tata Neu हे टाटा समूहाचे सुपर अ‍ॅप आता 7 एप्रिल रोजी लॉन्चसाठी सज्ज आहे. गुगल प्ले स्टोअऱच्या आपल्या पेजवर टीझरच्या माध्यमातून कंपनीने याची माहिती दिली आहे.

प्रथम इंडियन प्रीमियर लीग टूर्नामेंटबरोबर सुपर अ‍ॅपची कंपनीने जाहीरातही सुरु केली आहे. Tata Neu हे समूहाचे सुपर अ‍ॅप आहे जे त्याच्या सर्व डिजिटल सेवा आणि अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते. सध्या हे अ‍ॅप फक्त टाटा ग्रुपचे कर्मचारी वापरत आहेत, यानंतर 7 एप्रिल रोजी लॉन्च झाल्यानंतर ते अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

Tata Neu अ‍ॅपद्वारे तुम्ही टाटा ग्रुपच्या विविध डिजिटल सेवा ज्यामध्ये AirAsia India, Air India किंवा Taj Group च्या हॉटेल्सवर फ्लाईट्सची तिकिटे बुक करणे, बिग बास्केटवरुन किराणा माल ऑर्डर करणं, टाटाच्या 1mg वरून औषधे, किंवा क्रोमावरुन इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑर्डर करणं किंवा Westside वरून कपडे खरेदी करणे, यां सेवांचा एकाच ठिकाणी लाभ घेऊ शकता.

अ‍ॅपवरून खरेदी करणाऱ्यांना कंपनी नवीन कॉईन देईल, जी या अ‍ॅपवर रिडीम केली जाऊ शकतात. हे कॉइन्स नंतर रिडीम करुन ते अ‍ॅपवरुन पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी वापरता येतील. टाटा न्यू अ‍ॅपच्या जगामध्ये डिजीटल कंटेटचा आनंद घ्या, पेमेंट करा, तुमचे आर्थिक व्यवहार संभाळा, पुढील ट्रीप प्लॅन करा किंवा तुमचं पुढील जेवण यावरुन मागवा. या टाटा न्यू अ‍ॅपच्या जगामध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी आणि अनुभवण्यासारखं बरंच काही आहे,” असं गुगल प्लेवरील या अ‍ॅपच्या डिस्क्रीप्शनमध्ये माहीती दिली आहे.

देशामधील अ‍ॅमेझॉन, पेटीएम, रिलायन्स जिओ यासारख्या कंपन्यांनी त्यांचे सुपर अ‍ॅप्स बनवले आहेत. यामध्ये पेमेंट, कंटेंट, शॉपिंग, भटकंतीसाठी तिकीटं काढणं, किरणामाल असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ज्या देशात लोक स्मार्टफोन अधिक वापरत असतील तर तो देश किंवा ते ठिकाण हा सुपर अ‍ॅपच्या वापरासाठी उत्तम बाजारपेठ समजला जातो. अशा ठिकाणी भारतातील अ‍ॅप्स अशीच एक बाजारपेठ बनवू पाहत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top