सलग 3 डाव मुंबई इंडियन्स पराभूत; ‘त्या’ खेळाडूमुळे बसला झटका, मुंबई गेली तळाला

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई :

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. आज 14 व्या सामन्यात मुंबई आणि कोलकाता यांच्यात तर रोमहर्षक लढत झाली असून या सामन्यात कोलकाताने मुंबईला पाच गडी राखून धूळ चारली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सच्या संघांनी पराभवाची हॅट-ट्रीक नोंदवली. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत मुंबईचं पारडे जड मानलं जात होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची पिसं काढत कोलकात्याला शानदार विजय मिळवून दिला. आज तो आंद्रे रसेलच्या (Andre Russell) भूमिकेत होता. अवघ्या 15 चेंडूत त्याने नाबाद 56 धावा फटकावल्या. या धमाकेदार फलंदाजीनंतर पॅट कमिन्सच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

एकवेळ डेंजरस आंद्रे रसेलला स्वस्तात आऊट केल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामना जिंकेल असं वाटलं होतं. पण पॅट कमिन्सने काही चेंडूत खेळच बदलून टाकला. आणि या पॅट कमिन्समुळे मुंबई इंडियन्सला तिसऱ्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला.

यापूर्वी सलग इतका वाईट पराभव मुंबईच्या वाट्याला कधी आला नव्हता. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कमिन्सच्या एकट्याच्या बळावर केकेआरने हा सामना पाच विकेट आणि 24 चेंडू राखून जिंकला. त्याने एका ओव्हरमध्ये चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. केकेआरचा संघ गुणतालिकेत 6 पॉईंटसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सची टीम सलग तिसऱ्या पराभवामुळे नवव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कमिन्सच्या एकट्याच्या बळावर केकेआरने हा सामना पाच विकेट आणि 24 चेंडू राखून जिंकला. त्याने एका ओव्हरमध्ये चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. केकेआरचा संघ गुणतालिकेत 6 पॉईंटसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सची टीम सलग तिसऱ्या पराभवामुळे नवव्या स्थानावर आहे.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top