तारक मेहता का उल्टा चश्मा सिरीयलमधील प्रत्येक किरदार फेमस आहे. त्यातल्या त्यात जेठालाल आणि त्यांचे वृद्ध वडील बापूजी हे दोघे अफलातून आहेत. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा खळखळून हसवतात. बापूजींचे खरे नाव अमित भट्ट आहे. आज त्यांचे हजारो चाहते आहेत. विशेषकरून लहान मुले तर त्यांच्या प्रेमात आहेत. सिरीयलमध्ये अमित भट्ट चंपकलाल जयंतीलाल गड़ाची म्हणजेच बापूजींची भूमिका करतात.
या भूमिकेसाठी दर्शकांचे त्यांना भरभरून प्रेम मिळाले आहेत. लोक त्यांना प्रेमाने चंपक चाचा म्हणतात. पण तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, सिरीयलमध्ये वृद्ध दिसणारे अमित भट्ट खऱ्या आयुष्यामध्ये खूपच तरुण आहेत. अगदी सिरीयल सुरु झाली तेव्हा तर ते फक्त चाळीशीत होते. आता तुम्हाला वाटत असेल की, चंपक चाचाचे वय नाही म्हणलं तरीही ७० च्या आसपास. पण तुम्ही चुकताय मित्रांनो… आजच्या या घडीला अजून त्यांनी पन्नाशीही ओलांडलेली नाही.
त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९७२ रोजी झाला असून आजच्या घडीला त्यांचे वय ४९ आहे. अमित भट्ट हे खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट असून त्या खूपच सुंदर आहेत. सध्या ते मुंबई मध्ये राहत असून त्यांना दोन जुळी मुले आहेत. अमित यांची पत्नी कृती भट्ट ही इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून दूरच असते. कोरोना काळात शुटींग बंद असल्यामुळे चंपकलाल जयंतीलाल गड़ा बोले तो अपने चंपकचाचा आपल्याला दिसले नव्हते. मात्र कोरोनाचा पराभव ओसरल्यावर ते पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आले आणि त्यांनी आपल्याला खळखळून हसवले.
सब टीव्ही वरील या मालिकेने त्यांना मोठी ओळख दिली. आजही ते लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना विश्वास बसत नाही की हेच चंपक चाचा उर्फ बापूजी आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद