टाटा मोटर्सचा आपल्या ग्राहकांना अजून एक दणका; बघा, नेमकं झालंय काय?

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई

मारुती सुझुकी, महिंद्रा & महिंद्रा, हिरो अशा ऑटो सेक्टरमधील कंपन्यांनी आपल्या वाहनांचे दर वाढवले होते. यानंतर आता मार्केटमध्ये तुफानी आणि दमदार गाड्या आणणाऱ्या टाटा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किमती वाढवत आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. काही दिवसांपूर्वी TATA मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली होती, तेव्हा काही मोजक्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली होती. त्या दरवाढीनंतर नेक्सॉन, पंच, हॅरियर आणि टियागो या वाहनांच्या किमती बदलल्या होत्या.

टाटा मोटर्सने या वर्षी जानेवारी आणि मार्च महिन्यात त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा कंपनीने वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने अलीकडेच आपल्या टाटा पंच आणि टाटा हॅरियरच्या किमती सुधारित केल्या होत्या. आता अजून दोन लोकप्रिय गाड्यांच्या किंमती टाटा मोटर्सने वाढवल्या आहेत. ताज्या माहितीनुसार टाटा मोटर्सने त्यांच्या 6 आणि 7 सीटर एसयूव्ही टाटा सफारी (SUV Tata Safari) आणि प्रीमियम हॅचबॅक कार टाटा अल्ट्रॉझ (Tata Altorz) या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.

कंपनीने सफारी एक्सई एमटीच्या (Safari XE MT) बेस व्हेरियंटची किंमत 22,500 रुपयांनी तर XM व्हेरिएंटची किंमत 13,000 रुपयांनी वाढवली आहे. यापूर्वीच कंपनीने आपल्या अनेक वाहनांच्या आणि व्हेरियंटच्या किमती सरासरी 1.1 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत स्टील आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने वाहनांच्या किमती पाच ते आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top