महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर महागाईचा जो भडका उडाला आहे, तो अजूनही थांबलेला नाही. इंधन, दुध, भाजीपाला, घरगुती व व्यावसायिक गॅस अशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू महाग होत आहेत. ऑटो, बांधकाम सेक्टरमध्येही महागाईने आपला झटका दाखवला आहे. अशातच आता अजून एक मोठी बातमी समोर आलेली आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जाणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे.
14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासून घरगुती सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता घरगुती सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.
दिल्लीत 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर 102.50 रुपयांनी वाढून 2355 रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी 1 एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर 268.50 रुपयांनी वाढले होते. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच अचानक मिटिंग घेत रेपो रेट वाढविले होते. यामुळे लोकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. त्यातच आता गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद