टॅकर घोटाळ्यातील आरोपींना खंडपीठाकडून तात्पुरता जामीन

0



महाराष्ट्र दर्शन न्युज/पारनेर

पारनेर तालुक्यातील टॅकर घोटाळ्यातील आरोपींचा अटकपुर्व जामीन अहमदनगर  सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपींकडून  सत्र न्यायालयाच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. गुरुवारी याबाबत  न्यायमुर्ती एस. जी. मेहेरे यांच्या समोर सुनावनी घेण्यात आली. त्यावेळी आरोपींना काही अटींवर महीनाभरासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला. 

अहमदनगर  जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी साई सहारा इंफ्रा अँण्ड फॅसीलीटी प्रा. लि. या खाजगी संस्थेला सन २०१९ - २० मध्ये कंत्राट देण्यात आले होते.  त्यापैकी पारनेर तालुक्यात या खाजगी कंपनीने पाणी पुरवठा करताना बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांचा  शासकीय निधी हडपला असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल उच्च न्यायालया समोर ठेवण्यात आल्यानंतर साई सहारा या  कंपनी विरोधात शासणाच्या फसवणूकीचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे . 

बनावट जीपीएस अहवाल तयार करणे व पाणीपुरवठा समितीच्या महिलांच्या बनावट सह्या पोलिसांना तपासात  निष्पन्न झाल्या आहेत .  

त्यानंतर पोलिसांनी मुळ तक्रारदार  लोकजागृती सामाजिक संस्था यांच्याकडील महत्वाचे पुरावे व  लॅपटॉप  जप्त करून तपासणी साठी  सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सदर अहवाला नंतरच गुन्ह्याची गंभीरता व व्याप्ती समजणार  असल्याचे लोकजागृती सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. 
उच्च न्यायालयात आरोपींच्या बाजूने वकील नितीन गवारे यांनी बाजु मांडली. तर मुळ तक्रारदार लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करून वतीने वकील चैतन्य धारुरकर यांनी बाजु मांडली. पुढील सुनावणी एक महीण्यानंतर ठेवण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top