ॲमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स साईटवर काही दिवसांपासून आकर्षक किंमतीत उन्हाळयातील गरजेच्या वस्तू विकल्या जात आहे. ऑनलाईन खरेदी केल्याचा लाभ देखील ग्राहकांना मिळत आहे. या ठिकाणी या सेलदरम्यान, अनेक महत्त्वाच्या उत्पादनांवर सूट मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.
देशातील अनेक शहरांत उन्हाच्या तडाख्याने तापमानात उच्चांक आला आहे. उन्हाळा आला की बाजारात एसी, कूलर आणि पंखे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. ॲमेझॉन सेल दरम्यान ग्राहक पंखे (Fans), कुलर (Cooler) आणि AC वर चांगल्या ऑफरसह डिस्काऊंट्सचा फायदा घेऊ शकतात.
तुम्हाला ई-कॉमर्स साईट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर जवळजवळ 1 हजार रुपयांच्या जवळपास किंमती असणारे शानदार पोर्टेबल पंखे सध्या उपलब्ध आहेत. उन्हाळयात लोडशेडिंगमुळे त्रस्त होणारे आपण हवा मिळण्यासाठी इतर पर्याय शोधत असतो. तर हा एक उत्तम पर्याय नक्कीच आहे. कारण वीज नसल्यावरही हे पंखे अनेक तास सहज चालतात.
ॲमेझॉनवरून तुम्ही अगदी 1 हजार रुपयांच्या बजेटमध्ये (1 हजार रुपयांपेक्षा कमी आणि जास्त किंमतीतही) उपलब्ध असणारे पोर्टेबल पंखे म्हणजेच एकदा की त्यांना चार्जिंग केली तर इतरत्र घेऊन जाऊ शकतो असे पंखे खरेदी करू शकता. विशेष म्हणजे वीज नसल्यावरही हे पंखे बरेच तास आपल्याला हवा देण्याचं काम करणार आहेत. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे कमी बजेटमध्ये येणारे अनेक चांगले पोर्टेबल पंखे उपलब्ध आहे. विजेशिवाय हे पंखे कंपनीनुसार जास्तीत जास्त 15 तासांपर्यंत चालतात.
Bajaj PYGMY MINI 110 MM FAN
बजाज ब्रँड हा तर सर्वांना परिचित आहेच. Bajaj PYGMY MINI 110 MM FAN हा Table Fan अगदी खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असणाऱ्या फॅनपैकी एक Chargeble Mini Fan आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा पंखा एकदा फुल चार्ज केला तर सलग 4 तास चालतो. हा पोर्टेबल पंखा यूएसबीद्वारे चार्ज होतो व यामध्ये Li-Ion Battery दिली आहे.
बजाजच्या या पंख्यामध्ये एक क्लिप देखील आहे जी वापरून तुम्ही तो पंखा जिथे हवा तिथे फिट करू शकता. ज्याचा उपयोग करून कोठेही फिट करू शकता. Bajaj PYGMY MINI 110 MM FAN ची मूळ किंमत 1395 रुपये असली तरी तो डिस्काऊंटचा लाभ मिळवून आपल्याला Amazon वर अंदाजे 1214 रुपयांना मिळतोय. ही ऑफर काही दिवसांसाठी असेल, त्यामुळे भविष्यात याची किंमत कमी-अधिक होऊ शकते. म्हणून आताच योग्य किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद