‘केजीएफ चॅप्टर 2’ सिनेमा स्वस्तात पाहायचाय? कुठे आणि कसा पाहणार, घ्या जाणून..

0



साऊथ सुपरस्टार यश (Yash) च्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सिनेमागृहात या सिनेमाच्या फ़क्त हिंदी व्हर्जनने तब्बल 427.5 कोटींचा व्यवसाय करत धुमाकूळ घातला आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. आता तुम्हालाही हा जबरदस्त कमाई करणारा, ॲक्शनतोड सिनेमा पाहता येणार आहे त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करावं लागणार आहे.

KGF Chapter 2 कुठे आणि कसा पाहता येणार?

केजीएफ चॅप्टर-2 सिनेमाची स्टोरी, संगीत, दिग्दर्शन असं सर्वच उत्तम प्रकारे सादर करण्यात आलं आहे. आता काही दिवसांपूर्वी ॲमेझॉनने ग्राहकांना अनेक सिनेमे भाडेतत्त्वावर पाहण्यासाठी एक सेवा देण्याची घोषणा केली होती. आता त्यानुसार रॉकिंग स्टार यशचा (Rocking Star Yash) ‘केजीएफ चॅप्टर 2’ हा सिनेमा तुम्हाला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ॲपवर पाहायला मिळणार आहे.

यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होतोय. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा पाच भाषेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही कोणत्याही डिव्हाईसवर ‘केजीएफ 2’ Amazon Prime Video च्या वेबसाईट किंवा ॲपवर पाहू शकता.

‘KGF Chapter 2’ हा सिनेमा जर भाडेतत्वावर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 199 रुपये भरावे लागणार आहेत. यामुळे तुम्हाला Amazon Prime Video च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनचीही गरज लागणार नाही. पैसे भरल्यानंतर केवळ एकदाच भाडे भरून तुम्ही हा सिनेमा पेमेंट केल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये कधीही सुरू करू शकता. फक्त लक्षात ठेवा की, सिनेमा एकदा बघण्यासाठी सुरू केला तर तो पुढील 48 तासांमध्ये आपल्याला संपूर्ण पाहावा लागणार आहे अन्यथा तुमची योजना कालबाह्य होईल. मग बघा स्वस्तात सिनेमा तोही चांगल्या क्वालिटीमध्ये! जास्त पैसे न घालवता आपण अनेक जण घरी बसून हा सिनेमा निवांत पाहू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top