माजी मंत्री महादेवजी जानकर व जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0

महाराष्ट्र दर्शन न्युज / शिरूर
रा.स.प. राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर व जनता दल पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे  प्रदेशकार्याध्यक्ष  नाथाभाऊ शेवाळे यांची भेट सुमारे 3 च्या सुमारास न्हावरे फाटा याठिकाणी झाली. त्यानंतर मा.मंत्री महादेवजी जानकर साहेब यांनी नाथाभाऊ शेवाळे यांच्या हॉटेल शांताई येथे भेट दिली. या भेटी नंतर नाथाभाऊ शेवाळे मा. मंत्री महादेवजी जानकर व संग्राम शेवाळे यांनी त्यांच्या गाडीत एकत्र प्रवास केला. या प्रवास दरम्यान त्यांनी निघोज व टाकळी हाजी येथील मळगंगा देवीचे दर्शन घेतले. तसेच त्यानंतर शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजयजी बरहाते यांच्या निवासस्थानी भेट दिली. व आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या भेटी नंतर टाकळी हाजी येथे माजी आमदार बापूसाहेब गावडे यांच्या नातवाच्या लग्नाला भेट दिली. मा.मंत्री महादेवजी जानकर व जनता दलाचे प्रदेशकार्याध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे हे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या. लग्न सोहळा संपन्न झाल्यावर या दोन्ही मान्यवरांनी रात्री न्हावरे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर साहेब यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, नाथाभाऊ शेवाळे व संग्राम शेवाळे यांची शिरूर तालुक्यातील राजकारण विषयी चर्चा झाली. तसेच येणाऱ्या काळात शिरूर जिल्हा परिषद निवडणुकीत आपण ताकद लावू असे माजी मंत्री महादेवजी जानकर यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक मध्ये रा.स.प. व जनता दल यांची युती होते की काय याची चर्चा राजकीय नेते व शिरूर तालुक्याच्या राजकारणात होत आहे.  तर या 8 तासाच्या प्रवासात नेमकी हे दोन्ही पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर व नाथाभाऊ शेवाळे यांची काय चर्चा झाली व ते काय भूमिका घेणार याकडे शिरूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. जर असे झालेच तर शिरूर तालुका जिल्हा परिषद  निवडणूक चुरशीची होणार आणि तालुक्याच्या राजकारणात खळबळ होणार हे नक्कीच.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top